वेंगुर्ला /-
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे नेते आणि विद्यमान खासदार नारायण राणे सोमवार २८ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता व सिंधुदुर्गातिल चिपी विमानतळ प्रकल्पाला भेट देणार आहेत. या भेटीमध्ये ते विमानतळाच्या कामाचा आढावा संबंधित अधिकाऱ्यांकडून घेऊन विमानतळाची पाहणी करणार आहे.विमानतळावरील कामे अजूनही अपूर्ण असताना पुन्हा एकदा विमानतळावर विमान उतरणार अशा वल्गना सत्ताधाऱ्यांकडून होत आहेत. मात्र नुकत्याच एका कार्यक्रमात नारायण राणे यांनी चिपी येथील विमानतळावर आपणच विमान उतरविणार असे जाहीर केले होते.दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर नारायण राणे उद्या या विमानतळ प्रकल्पाला भेट देणार असून ते कोणती भूमिका मांडतात याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.