दिल्ली : प्रसिद्ध पखवाज वादक पंडित रविशंकर उपाध्याय यांना विनयभंगाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. रविशंकर उपाध्याय यांच्यावर त्यांच्या कथक सेंटरमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानीने विनयभंग आणि गैरकृत्य केल्या प्रकरणी चाणक्यपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. पंडित रविशंकर उपाध्याय यांच्या अटकेला नवी दिल्ली जिल्हा डीसीपीने दुजोरा दिला आहे.
पंडित रविशंकर उपाध्याय यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता तिथून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पीडित विद्यार्थ्याने सांगितले आहे की ती गेल्या 11 वर्षांपासून चाणक्यपुरी येथील कथकच्या राष्ट्रीय संस्थेमधून शिकत आहे. डिप्लोमा कोर्स करण्याव्यतिरिक्त ती कथक शिकत आहे. ती पंडित रविशंकर उपाध्याय कडून पखवाज शिकत होती.
पीडित मुलीने सांगितले की, पंडित रविशंकर आपल्याशिवाय बर्याच मुलींसोबत त्यांनी छेडछाड केली आहे. पंडित रविशंकर हे तिच्या पायाला स्पर्श करून अश्लील गोष्टी करायचे आणि हे गेल्या दीड वर्षापासून चालू होते. जानेवारी 2020 मध्ये अश्लील मेसेज देखील पाठविले होते.
जेव्हा पंडित रविशंकरने पीडितेसोबत केंद्रात अश्लील कृत्य केले तेव्हा ती तेथून पळून गेली आणि वरिष्ठांकडे तक्रार केली आणि संपूर्ण घटनेबद्दल सांगितले. त्यानंतर सर्वकाही त्याच्या पालकांना कळविल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.