वेंगुर्ला /-
वेंगुर्ला नगरपरिषद एकलव्य नेमबाजी प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन वेंगुर्ला कॅम्प स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय पंच विक्रम भांगले यांच्या हस्ते फीत कापून व वेंगुर्ले न.प.नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले.यावेळी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ,प्रशिक्षण संचालक कांचन उपरकर,गटनेते सुहास गवंडळकर,प्रकाश डिचोलकर,नगरसेवक प्रशांत आपटे,विधाता सावंत,नगरसेविका श्रेया मयेकर,कृतिका कुबल,शितल आंगचेकर,साक्षी पेडणेकर,प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल आदी उपस्थित होते.यावेळी विक्रम भांगले यांनी वेंगुर्लेतील या प्रशिक्षण केंद्रामुळे राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतील.त्यासाठी आपल्याकडील मुलांना लागणारे मार्गदर्शन देण्याची तयारी असल्याचे सांगितले. नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी वेंगुर्ला तालुक्यात सर्व खेळ सुरू करणे हा आपला मुख्य उद्देश राहिला असून या प्रशिक्षणातून पुढील वर्षी नेमबाजी स्पर्धेत आपल्या तालुक्यातील विद्यार्थी जिल्ह्यात प्रथम असतील,असा विश्वास व्यक्त केला.प्रशांत आपटे यांनी प्रास्तविक केले व नगरसेविका शितल आंगचेकर यांनी आभार मानले.