आचरा /-
हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे शाळा पिरावाडीच्या इमारत दुरुस्ती कामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य जेराॅन फर्नांडिस यांच्या हस्ते झाला. या वेळी त्यांच्या सोबत अनिल करंजे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नित्यानंद तळवडकर, मुख्याध्यापक सुभाष नाटेकर, ग्रामपंचायत सदस्या श्रीमती अनुष्का गांवकर, भावना कुबल, वैष्णवी धुरी, ठेकेदार राजू त्रिंबककर आदी मान्यवर उपस्थित होते.
पिरावाडी प्राथमिक शाळेची इमारत धोकादायक बनल्याने इमारत दुरुस्ती साठी ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर, डॉ प्रमोद कोळंबकर, अनिल करंजे यांनी जिल्हा परिषद सदस्य जेराॅन फर्नांडिस यांच्या कडे पाठपुरावा सुरू केला होता.याबाबत मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्राधान्य देत ९लाख रुपये निधी मंजूर करून घेतला होता. या कामाचा शुभारंभ गुरुवारी केला गेला.