सध्या लहान मुलांना कोडिंग शिकवा, असं सांगणारी एक जाहिरात सतत सोशल मीडियावर पाहायला मिळते. एका व्हाईटहॅट ज्युनियर नावाच्या कंपनीने केलेली ही जाहिरात आहे. 6 ते 14 वयोगटातील मुलांनी कोडिंग करणं शिकून घेतल्यास ते किती फायद्याचं आहे, सरकारने इयत्ता सहावीपासून विद्यार्थ्यांनी कोडिंग शिकणं अनिवार्य केलं आहे, इत्यादी गोष्टी या जाहिरातीत सांगण्यात येतात.पण या जाहिरातींवरून पालकांमध्ये संभ्रमावस्था वाढून याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना स्पष्टीकरण विचारण्यात आलं. शिक्षणमंत्र्यांनीसुद्धा याची दखल घेऊन दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना लोकांनी बळी पडू नये, असं आवाहन केलं आहे.
या प्रकारानंतर सध्या तरी ‘कोडिंग अनिवार्य आहे’ अशा आशयाची जाहिरात दिसणं बंद असलं तरी या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.तसंच कोडिंग म्हणजे काय? लहान वयातच अगदी सहाव्या वर्षांपासूनच मुलांना कोडिंग शिकवणं कितपत योग्य आहे? इतक्या लहान वयातच कोडिंग वगैरे क्लिष्ट गोष्टी मुलांच्या पुढ्यात ठेवल्यानंतर त्याचा त्यांच्यावर दबाव तर येणार नाही ना? अशा प्रकारच्या चर्चा पालकवर्गामध्ये रंगल्या आहेत.

कोडिंग म्हणजे काय?

आपण संगणक वापरत असताना फक्त बाहेरून सुरू असलेली प्रक्रिया आपल्याला दिसते. पण ही प्रक्रिया घडण्यासाठी जी काही रचना तयार केलेली असते त्याला कोडिंग असं म्हटलं जातं. ही रचना आपण बाहेरून पाहू शकत नाही.कोडिंगला प्रोग्रामिंग किंवा सोप्या भाषेत काँप्युटरची भाषा असंही म्हणू शकतो. संगणकावर आपण जे काही करतो, ते कोडिंगच्या माध्यमातूनच केलं जातं. या कोडिंगचा वापर करून वेबसाईट, गेम किंवा अॅप तयार करता येतात. तसंच याव्यतिरिक्त, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स सारख्या गोष्टी सुद्धा कोडिंगद्वारे तयार करता येऊ शकतात.कोडिंग करण्याच्याही अनेक लँग्वेज आहेत. या म्हणजे सी, सी++, जावा, HTML, पायथॉन इत्यादी. यापैकी काही लँग्वेज वेबसाईट बनवण्यासाठी किंवा अँड्रॉईड अॅप बनवण्यासाठी वापरल्या जातात. संबंधित लँग्वेजचं ज्ञान असेल तरच ते अॅप, गेम बनवण्याची प्रक्रिया आपल्याला कळू शकते.

कंपनीचे दावे आणि पालकांमधील संभ्रमावस्था या कंपनीकडून लहान वयातच मुलांना कोडिंग शिकवल्यामुळे मुलांच्या मेंदूचा वेगाने विकास होतो, त्यांची लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता वाढीस लागते, कोडिंग हीच भविष्यातील सुवर्णसंधींची गुरुकिल्ली आहे, आपल्या ऑनलाईन कोर्सच्या मदतीने मुलांना उद्योजक, व्यावसायिक, इंटरप्यूनर बनवा.

सध्या असलेल्या नोकऱ्यांपैकी 60 ते 80 टक्के नोकऱ्या भविष्यात अस्तित्वात नसतील. त्यामुळे मुलांना आताच कोडिंग या विषयात मास्टर बनवा, अशा प्रकारचे विविध दावे करण्यात येतात. इतकंच नव्हे, तर चक्क भारत सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणात कोडिंगचा समावेश केला आहे. सहाव्या इयत्तेपासूनच कोडिंग अनिवार्य करण्यात आलं आहे, अशी जाहिरात दाखवणं कंपनीने सुरू केलं.क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग, शिखर धवन, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेता सोनू सुद यांच्यासह अनेक मोठे सेलिब्रिटी या जाहिरातीमध्ये आपल्या मुलांसह दिसतात. पण या अॅडमधील मजकूर आक्षेपार्ह असल्याचा आरोप होताना दिसत आहे. आपलं सबस्क्रिप्शन लोकांनी विकत घ्यावं, यासाठी कंपनीने गोष्टी सांगत दिशाभूल केल्याचा आरोप होऊ लागला.

पण यावरून लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं. इतक्या लहान वयात तोही कोडिंगसारखा विषय शिकवणं खरंच योग्य आहे का, शिवाय हा विषय अनिवार्य कसा काय करण्यात आला, याबाबत उलटसुलट चर्चा होऊ लागली. या जाहिरातीवरून लोकांमध्ये संभ्रमावस्था वाढल्यानंतर महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्र्यांना या विषयात हस्तक्षेप करावा लागला आहे.

कोडिंग अनिवार्य नाही, शिक्षण मंत्रालयाचं स्पष्टीकरण
कोरोना काळात गेल्या सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ शाळा बंद आहेत. दरम्यान, अनेक शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू झाल्या आहेत. कोडिंग विषय या ‘ऑनलाईन’ शिक्षणाचाच भाग असल्याचा गैरसमज पालकांना झाला. त्यामुळे कोडिंग विषय शिकवण्यासाठी शिक्षकांना मोठ्या प्रमाणात विचारणा होऊ लागली.दरम्यान, जाहिरातींमुळे लोकांच्या संभ्रमावस्थेत आणखीनच जास्त वाढ झाली. रिमा कथले या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत प्रश्न विचारण्यात आला.या पोस्टमध्ये रिमा म्हणतात, “यांची जाहिरात रोज एफबीवर येते..आज तर हाईटच झाली..काय तर म्हणे इयत्ता सहावीपासून कोडिंग अनिवार्य आहे..हे कधी झालं? कुणी अनिवार्य केलं? एक तर मला शिक्षण कळत नाही किंवा ही जाहिरात चुकीची आहे. हा काय प्रकार आहे पालकांची दिशाभूल करण्याचा?”

नवीन शैक्षणिक धोरणानुसार राष्ट्रीय व राज्य अभ्यासक्रम आराखडा अद्याप तयार झालेला नाही. त्यामुळे राज्य शासनाने वा ने असा कोणताही निर्णय अद्याप घेतला नसल्याने पालकांनी व विद्यार्थ्यांनी अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नये असे मी आवाहन करते.

रिमा कथले यांच्या पोस्टची दखल घेत माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी कोडिंग शिकवण्याच्या जाहिरातबाजीबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांना टॅग करून स्पष्टीकरण देण्याची विनंती केली.त्याला गायकवाड यांनी उत्तर दिलं. “नवीन शैक्षणिक धोरणानुसार राष्ट्रीय व राज्य अभ्यासक्रम आराखडा अद्याप तयार झालेला नाही. त्यामुळे राज्य शासनाने किंवा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) यांनी अशा प्रकारचा कोणताही निर्णय अद्याप घेतला नाही. पालक आणि विद्यार्थ्यांनी अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नये, असं आवाहन शालेय शिक्षणंत्री गायकवाड यांनी केलं आहे.

कोडिंग अनिवार्य नाही, शिक्षण मंत्रालयाचं स्पष्टीकरण
कोरोना काळात गेल्या सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ शाळा बंद आहेत. दरम्यान, अनेक शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू झाल्या आहेत. कोडिंग विषय या ‘ऑनलाईन’ शिक्षणाचाच भाग असल्याचा गैरसमज पालकांना झाला. त्यामुळे कोडिंग विषय शिकवण्यासाठी शिक्षकांना मोठ्या प्रमाणात विचारणा होऊ लागली.दरम्यान, जाहिरातींमुळे लोकांच्या संभ्रमावस्थेत आणखीनच जास्त वाढ झाली. रिमा कथले या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत प्रश्न विचारण्यात आला.या पोस्टमध्ये रिमा म्हणतात, “यांची जाहिरात रोज एफबीवर येते..आज तर हाईटच झाली..काय तर म्हणे इयत्ता सहावीपासून कोडिंग अनिवार्य आहे..हे कधी झालं? कुणी अनिवार्य केलं? एक तर मला शिक्षण कळत नाही किंवा ही जाहिरात चुकीची आहे. हा काय प्रकार आहे पालकांची दिशाभूल करण्याचा?”

नवीन शैक्षणिक धोरणानुसार राष्ट्रीय व राज्य अभ्यासक्रम आराखडा अद्याप तयार झालेला नाही. त्यामुळे राज्य शासनाने वा @scertmaha ने असा कोणताही निर्णय अद्याप घेतला नसल्याने पालकांनी व विद्यार्थ्यांनी अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नये असे मी आवाहन करते.

रिमा कथले यांच्या पोस्टची दखल घेत माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी कोडिंग शिकवण्याच्या जाहिरातबाजीबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांना टॅग करून स्पष्टीकरण देण्याची विनंती केली.त्याला गायकवाड यांनी उत्तर दिलं. “नवीन शैक्षणिक धोरणानुसार राष्ट्रीय व राज्य अभ्यासक्रम आराखडा अद्याप तयार झालेला नाही. त्यामुळे राज्य शासनाने किंवा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) यांनी अशा प्रकारचा कोणताही निर्णय अद्याप घेतला नाही. पालक आणि विद्यार्थ्यांनी अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नये, असं आवाहन शालेय शिक्षणंत्री गायकवाड यांनी केलं आहे.

शिक्षण मसुद्यातही फक्त ओझरता उल्लेख यंदाच्या राष्ट्रीय शिक्षण मसुद्यात शालेय स्तरापासूनच कोडिंग विषय शिकवण्याबाबत ओझरता उल्लेख करण्यात आला आहे. एकविसाव्या शतकातील कौशल्याच्या दृष्टिकोनातून सहावीपासूनच विद्यार्थ्यांना कोडिंग विषय शिकवला जाऊ शकतो, असं शालेय शिक्षण विभागाच्या सचिव अनिता कारवाल यांनी म्हटलं होतं.पण शिक्षण मसुद्यात कुठेही कोडिंग अनिवार्य असल्याचा उल्लेख नाही, याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी.
‘हे तर शुद्ध मार्केटिंग’ युट्यूब, फेसबुक यांच्यासारख्या सोशल मीडियावर सध्या जाहिराती मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत. यामुळेच हा विषय लोकांच्या नजरेस आला. एखाद्या क्लासचं इतकं मार्केटिंग कशामुळे हा प्रश्नही विचारण्यात येत आहे.चाईल्ड सायकॅट्रिस्ट डॉ. भूषण शुक्ल म्हणतात, “एखाद्या चतुर मार्केटिंगतज्ज्ञ व्यक्तीने एखादं आकर्षक वाक्य घ्यावं आणि माती विकायला सुरू करावी, लोकांनीही ती विकत घ्यावी, असा हा प्रकार मला वाटतो.”

पुण्यात सर्जनशील पालक संघटना चालवणारे चेतन एरंडे यांच्या मते, “आपले मूल जितक्या लवकर कोडिंग शिकायला सुरुवात करेल तितका तो मोठा म्हणजेच भरपूर पैसे मिळवणारा प्रोग्रॅमर होईल असा एक सर्वसाधारण समज आपल्याकडे आहे. किंबहुना कोडिंगचे क्लासेस घेणाऱ्या मंडळींनी तो जाणूनबुजून पसरवला आहे.”
याबाबत व्हाईटहॅट ज्युनियरची बाजू अधिक सविस्तरपणे समजून घेण्यासाठी बीबीसी मराठीने त्यांच्याशीही संपर्क साधला.व्हाईटहॅट कंपनीसाठी मीडियाचं काम पाहणारे सुरेश थापा म्हणाले, “ती जाहिरात आपण आधीच मागे घेतली आहे. त्यामुळे त्याबाबत अधिक बोलणं आता योग्य राहणार नाही,” असं ते म्हणाले.पण, थापा यांच्या मते भविष्यात कोडिंग विषयाला प्रचंड महत्त्व येणार आहे. याबाबत बोलताना ते म्हणतात, “कोडिंग हा विषय आता जरी अनिवार्य नसला तरी येणाऱ्या काळात तो नक्कीच अभ्यासक्रमात समाविष्ट होईल. जगभरात कोडिंग विषय लहान वयातच विद्यार्थ्यांना शिकवला जातो. काळाची पावले ओळखूनच लोकांमध्ये कोडिंगबाबत जागृती निर्माण करत आहोत.

लहान मुलांवर ‘कोडिंग’ करण्याचा दबाव? चाईल्ड सायकॅट्रिस्ट डॉ. भूषण शुक्ल म्हणतात, “ज्या मुलांना आपली खासगी स्वच्छतेची कामंसुद्धा करण्यासाठी आईची मदत लागते, त्यांना कोडिंग कसं कळणार? याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. कोडिंगमुळे मुलांच्या मेंदूचा विकास होतो, असं ते सांगतात. पण कोडिंग हा प्रकार गेल्या काही वर्षांत आला आहे. त्यामुळे मानवी विकास, बौद्धिक विकास यांच्याशी संबंध आहे, असं मला तरी वाटत नाही.”मुंबईच्या न्यू होरायझन्स चाईल्ड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये डेव्हलपमेंटल पेडियाट्रिशियन म्हणून काम पाहणारे डॉ. समीर दलवाई यांचंही अशाच प्रकारचं मत आहे.ते सांगतात, “मुलांवर विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा मारा होत असताना यात कोडिंगसारख्या विषयाची भर पडली आहे. आपल्या 7 वर्षीय मुलांनी कोडिंगचे क्लास शिकवून बनवलेलं अॅप विकत घेण्यासाठी कोणताच गुंतवणूकदार दारात तुमची वाट पाहत उभा राहणार नाही. मुलांवर हे शिकण्याचा दबाव टाकण्यापेक्षा त्यांना खऱ्या खेळांमध्ये भाग घेऊ द्यावा.”
तसेच क्लासची फी हासुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.

“एखाद्या क्लासची हजारो रुपयांची फी भरल्यानंतर मुलाने ते करण्यास नकार दिला तर पालक नाराज होतात. पण फक्त पैसे भरले आहेत, म्हणून मुलांवर दबाव टाकणंही पालकांनी टाळलं पाहिजे. एखादा विषय समजत किंवा जमत नसेर तर मुलाला एक्झिटची संधी दिली जावी,” असं मत एरंडे यांनी नोंदवलं.
पण दुसरीकडे, विद्यार्थावर यामुळे दबाव येत असल्याची शक्यता व्हाईटहॅटचे सुरेश थापा फेटाळून लावतात. सुरेश यांच्या मते, “कोडिंग क्लासमुळे विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळते. लहान मुलं या क्लासमध्ये विविध अॅक्टिव्हिटी करत असल्याने त्यांचं पूर्ण लक्ष त्यामध्ये असतं. लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याचा फायदा होतो. क्लासच्या वेळेची मर्यादाही एक तासांपेक्षा जास्त नाही. त्यामुळे मुलं हसत-खेळत गोष्टी शिकू शकतात.”
“पहिली आणि दहावीमधील विद्यार्थ्यासाठी कोडिंग शिकवण्याच्या पद्धतीमध्ये फरक असतो. त्यामुळे वयानुसार योग्य त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवलं जातं. क्लासमध्ये आम्ही कोणत्याच विद्यार्थ्यावर दबाव टाकत नाही,” असं स्पष्टीकरण सुरेश थापा यांनी दिलं.मग, मुलांनी कोडिंग करावं की नाही?आता या सगळ्या गोष्टींमुळे मुलांनी मुलांनी लहान वयात कोडिंग शिकावं की शिकू नये? हा प्रश्न साहजिकच पडू शकतो.

चेतन एरंडे याचं उत्तर देताना सांगतात, “जरूर शिकावं, मात्र ते शिकण्याची पद्धत वेगळी असावी. प्रोग्रॅमिंग लँग्वेजचं तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे. मुलाने लहान वयात शिकलेली गोष्ट भविष्यात ती वापरली जाईल किंवा नाही, हे सांगू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी फक्त लँग्वेज शिकण्यावर जोर न देता कोडिंग ही प्रक्रिया समजून घेणं अशावेळी महत्त्वाचं ठरतं. शिवाय आपल्या मुलांचा इंटरेस्ट खरंच या विषयात आहे किंवा नाही हेसुद्धा आपण अचूकपणे ओळखलं पाहिजे.”
तर व्हाईटहॅटने “लोकांनी आमचा क्लास लावलाच पाहिजे, असं आम्ही म्हणत नाही. ज्याला या विषयात रस आहे, त्यांनी हा विषय शिकून घेतला तर त्यांना फायदा होऊ शकतो,” अशी बाजू मांडली आहे.

मुलांचा इंटरेस्ट कसा ओळखाल?
आजकाल एक तासाचे फ्री सेशन देऊन मुलांना कोडिंगमध्ये कसा रस आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न खासगी क्लासवाले करतात.मुलाच्या करिअरचं नुकसान होऊ नये म्हणून पालक हजारो किंवा लाखोंची फी भरायला तयार होतात. पण नंतर मुलाची ओढ वेगळ्या क्षेत्रात असल्याचं कळून येतं.हे टाळण्यासाठी PNH टेक्नॉलाजीचे संचालक प्रदीप नारायणकर यांनी एक उदाहरण समजावून सांगितलं. नारायणकर यांची कंपनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि रोबोटिक्स ट्रेनिंग क्षेत्रात काम करते.

ते सांगतात, “पालक आमच्याकडे आमच्याकडे रिमोट उघडून तपासणारे, इलेक्ट्रॉनिक उपकरणं उघडून त्यातील भाग पाहणारे मुलं क्लाससाठी घेऊन येतात. पण त्या प्रत्येक मुलाला खरंच त्यात इंटरेस्ट असतो असं नसतं. काही मुलं फक्त उत्सुकतेपोटीही असं करू शकतात.
“मुलाला कोणत्याही विषयाची खरंच आवड आहे किंवा नाही, हे पालकांनी सर्वप्रथम त्याचं निरीक्षण करावं. अशा मुलांसाठी अमेरिकेच्या एमआयटी संस्थेकडून चालवले जाणारे बेसिक कोर्स उपयोगी ठरू शकतात. त्याचप्रमाणे गुगल, मायक्रोसॉफ्ट, एडेक्स आणि कोर्सेरा यांचेही मोफत कोर्स आहेत.

“मुलाला हे मोफत कोर्स आधी करायला देऊन ते त्यात कितपत यश मिळवतात, हे तपासावं. या माध्यमातून त्यांचा विषयात किती रस आहे, हे आपण तज्ज्ञांशी बोलून समजून घेऊ शकतो. जाहिरातींना बळी पडून महागडे कोर्स खरेदी करण्यापेक्षा हा मार्ग जास्त उपयोगी ठरू शकतो.” असं नारायणकर यांना वाटतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page