✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

एस.के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संचलित, एस.एल. देसाई विद्यालय पाट व कै. एस.आर. पाटील कनिष्ठ महाविद्यालय तथा कै. डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य व विज्ञान उच्च महाविद्यालयात माननीय मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे गटातील नवी मुंबई येथील शिवसेना संपर्कप्रमुख व नगरसेवक मा.श्री. किशोर अशोक पाटकर पुरस्कृत सायकल वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला.

प्रशालेतील गरजू होतकरू आणि दूर राहत असलेल्या १०० विद्यार्थ्यांचा शाळा ते विद्यालय हा प्रवास सुखकर व्हावा ,त्यांचा वेळ वाचून तो वेळ त्यांनी अभ्यासात घालवावा या चांगल्या हेतूने पुरस्कर्ते व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री. किशोर अशोक पाटकर, पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक माननीय श्री. वैभव भोर, उपशहर प्रमुख वाशी येथील माननीय श्री .महेश परब ,व्यावसायिक माननीय श्री.विवेक अणावकर व माननीय श्री.अभय परुळेकर या सर्व मान्यवरांच्या हस्ते सायकल वितरण समारंभ संपन्न झाला.

प्रशालेतील इयत्ता दहावीतील कुमार रामदास मोर्यै या विद्यार्थ्याने सादर केलेल्या अप्रतिम पोवाड्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री. शामराव कोरे यांनी सर्व मान्यवरांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. शाळेतील ढोल पथकातील विद्यार्थ्यांनी सुरेख ढोल वाजवून सर्व मान्यवरांचे स्वागत करून शालेय परिसर दणाणून सोडला. नवी मुंबई येथून चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले, प्रसिद्धी पराङ्गमुख,दानशूर ,राजकारण व समाजकारणाची आवड असलेले, कार्यकर्तृत्ववान, स्वच्छता उपक्रम प्रमुख, घरबांधणी, आश्रम शाळा व अनाथ मुलांचे आधारस्तंभ, संत गाडगेबाबा, व महाराष्ट्र राज्य 2023 ‘सकाळ सन्मान’ पुरस्कार प्राप्त अशा शब्दात माननीय श्री. किशोर पाटकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव संस्था पदाधिकारी माननीय श्री .राजेश सामंत यांनी आपल्या भाषणातून केला .संस्थेच्या कार्याचा व उपक्रमांचा धावता आढावा घेऊन आमच्या शाळेवर तुमची कृपादृष्टी व प्रेम असेच राहू दे. असे मनोगतही त्यांनी व्यक्त केले.

मा. श्री. किशोर अशोक पाटकर, माननीय श्री .वैभव भोर, माननीय श्री .महेशजी परब, माननीय श्री.विवेक अणावकर ,मा.श्री. अभय परुळेकर या सर्व मान्यवरांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्था उपाध्यक्ष श्री. दिगंबर सामंत, संस्थापदाधिकारी श्री. देवदत्त साळगावकर ,श्री.राजेश सामंत, श्री. सुभाष चौधरी श्री. नारायण तळावडेकर, श्री. दीपक पाटकर यांच्या हस्ते संस्था व विद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तर ऋतुजा वायंगणकर, कृतिका परब, स्नेहा करलकर, पूजा मार्गी, निमिषा कोचरेकर, सिद्धार्थ करलकर ,सुयश गोसावी ,वेदिका नार्वेकर या गरजू विद्यार्थ्यांना सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सायकलचे वाटप करण्यात आले. सायकल लाभार्थी विद्यार्थ्यांतर्फे कुमारी. वेदिका नार्वेकर हीने आपले मनोगत व्यक्त केले.रवळनाथाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेलो आणि त्याच्या कृपेनेच हे कार्य माझ्या हातून घडले. हे माझे कर्तव्यच आहे .प्रत्यक्ष गावातील विद्यार्थ्यांना मदत करता आली पाहिजे हे विचार सतत मनात घोळत असतात. नवी मुंबई येथे सव्वा दोन हजार मोफत घरे मी लोकांना मिळवून दिली. लोकांना मदत करणे हे माझे आवडते काम आहे. सिंधुदुर्गातील प्रत्येक विद्यार्थी हा सधन व मोठा व्हायला पाहिजे यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. असे मनोगत माननीय श्री. किशोर अशोक पाटकर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.

दातृत्व हा गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात केला पाहिजे. आपण समाजाचे देणे लागतो ही भावना जेव्हा मनात येते तेव्हा असे समाजकार्य होते. शिक्षण क्षेत्रात जे तुम्ही काम करत आहात त्यासाठी परमेश्वर तुम्हाला व तुमच्या सहकाऱ्यांना अधिक बळ देवो. सायकली ह्या गरजू मुलांना मिळालेली फार मोठी अनमोल वस्तू आहे. त्याचा उपयोग करून आरोग्य संपन्न व्हा असा संदेश कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था उपाध्यक्ष मा. श्री. दिगंबर सामंत यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना दिला.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक श्री .शामराव कोरे ,सूत्रसंचालन सौ.जानह्वी पडते व श्री. सद्गुरू साटेलकर ,आभार प्रदर्शन पर्यवेक्षक श्री. राजन हंजनकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व १०० लाभार्थी विद्यार्थ्यांचे पालक व प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page