▪️विकासात्मक,रोजगार विषयक कामांसाठी मनसे नेहमीच मंत्री महोदयांशी अशाचप्रकारे पत्रव्यवहार करणारं…
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
सस्नेह जय महाराष्ट्र! पत्रास कारण की आपले दिनांक २१/०८/२३ चे पत्र,माननीय मंत्री महोदय आपण आपल्या विभागाचे काम करत असताना आपल्यालाही अनुभव असेलच या मुजोर सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांचा आणि अशावेळी आपण बंद दाराआड त्या अधिकाऱ्यांना कोणत्या भाषेत काय समजतात याचा.माननीय मंत्री महोदय कदाचित आपण आपल्या खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर घेतलेली स्वाभिमानी प्रतिज्ञा अवलंबण्यास थोडासा विलंब झाला.साहेब आपण म्हणता त्याप्रमाणे महात्मा गांधी यांच्या सांगितलेल्या मार्गाने चालताना आपल्या सामान्य जनतेचा आवाज राज्यकर्त्ये तसेच प्रशासन पर्यंत पोहोचत नसेल तर महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक वि.दा सावरकर यांचा मार्ग सुद्धा कधी तरी अवलंबावा लागतो म्हणूनच या मार्गाचा आवाज आपल्या अपेक्षित जागी लवकर पोहोचतो याचे उदाहरण म्हणजे गेल्या पाच आणि मधली अडीज वर्षे सोडली तर त्यानंतर आताचे एक दीड वर्ष यानंतरचे आपले राज साहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र सैनिकांसाठीचे पत्र.
कोकणचा सुपुत्र राज्याच्या महत्त्वाच्या खात्याचा मंत्रि म्हणून कोकणवासीयांच्या मोठ्या अपेक्षा आपल्या कडून आहेत पण मधली अडीच वर्षे सोडली तर गेली पाच वर्षे व आत्ताची एक दीड वर्षे आपण अनेकदा गेली सतरा वर्षे जवळपास पंधरा हजार कोटी पेक्षाही जास्त खर्चून रखडलेला मुंबई गोवा महामार्गाची आपण अनेकदा धावती पाहणी केली तरीही परिस्थिती जैसे थेच.म्हणून शेवटी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी यावर लक्ष देताच महाराष्ट्र सैनिकांनी कोकणी जनतेचा आवाज हातात दगड घेऊन काढल्यावरच तुम्हाला ऊन, पाऊस वारा याची तमा न बाळगता स्वतःच्या मातीसाठी काहीतरी करण्याची भावना जागी झाली.असो तूर्तास इथेच थांबतो भविष्यात वेळोवेळी आपण सुरू केलेल्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून कोकणी जनतेचा आवाज आपल्यापर्यंत पत्राच्या माध्यमातून पोहोचवत राहू.असे मनसेचे माजी विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी दिले आहे सा.बा मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पत्रास उत्तर.
