✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही कुडाळ भाजपा कार्यालय पटांगण येथे सिंधुदुर्ग राजाची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. आज भाजपा नेते निलेश राणे यांच्या शुभहस्ते सिंधुदुर्ग राजा मंडप उभारणीचा शुभारंभ सोहळा कुडाळ येथे पार पडला. यावेळी तालुकाध्यक्ष दादा साईल, संजय वेंगुर्लेकर, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, विशाल परब, रुपेश कानडे, पप्या तवटे, राजा धुरी, दीपक नारकर, ओमकार तेली, सर्व नगरसेवक भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
