✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.

पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 20 हजार रुपये किंमतीच्या 636 ग्रॅम वजनाच्या गांजासह वैशाली प्रकाश आसोलकर (वय 35, रा. रेडी, सुकळभाटवाडी, ता वेंगुर्ले) या महिलेला वेंगुर्ले पोलिसांनी 16 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 2 वाजून 52 मिनिटांनी छापा टाकून अटक केली आहे.आरोपी महिला वैशाली हिच्याकडे गांजा हा अंमलीपदार्थ असल्याची खबर वेंगुर्ले पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने संशयित आरोपी वैशाली हिच्याताब्यातून विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला 20 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करून तिला ताब्यात घेतले.याबाबत ची फिर्याद महिला पोलीस नाईक दीपिका सद्गुरू मठकर यांनी दिली असून आरोपी वैशाली आसोलकर हिच्या विरोधात एनडीपीएस कायदा 1985 चे कलम 8 (क), 10 (ब), ( दोन ) ( अ ) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे.अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page