✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.

अभ्यासाबरोबरच मुलांना रानभाज्यांची ओळख व्हावी या उद्देशाने प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन हा अभिनव उपक्रम घेण्यात आला. या प्रदर्शनाला बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. धनश्री पाटील यांनी भेट देऊन मुलांना रानभाज्यांविषयी माहिती दिली तसेच रानभाज्यांचे औषधी गुणधर्म सांगितले. या उपक्रमासाठी शालेय व्यवस्थापन कमिटी व मुख्याध्यापिका मिताली होडावडेकर, शिक्षक व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page