▪️प्रशालेच्या विविध लोकोपयोगी कामांसाठी १ लाख ११ हजार १११ रुपयाची मदत उद्योजक विशाल परब यांनी देणगी स्वरूपात सुपूर्द केली..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

आज १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनानिमित्त मिलाग्रीस हायस्कुल येथे भाजप युवानेते व उद्योजक श्री विशाल परब यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक रिचर्ड सालढणा गुरुजन वर्ग व विद्यार्थी,पालक व स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना श्री विशाल परब यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास व महत्व विषद केले.तसेच विद्यार्थ्यांना संबोधून तरुणाई कशा प्रकारे देशाच्या प्रगती त सहभागी होऊ शकते या बद्दल मार्गदर्शन केले. व भारताचे माजी पंतप्रधान अटबिहारी वाजपेयी व विद्यमान पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नवभारताच्या प्रगतीच्या संकल्प करावा असे आवाहन केले.तसेच प्रशालेच्या विविध लोकोपयोगी कामांसाठी १ लाख ११ हजार १११ रुपयाची देणगी सुपूर्द केली.तसेच यावेळी व्हॉईस प्रिन्सिपॉल सिस्टर नेबल तसेच सुपर वाइझर मेघना राऊळ व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page