▪️सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे संबंधित विभागाला आदेश..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

आंबोली घाटात येत्या आठवडाभरात रिफ्लेक्टर व रेडियम लावण्यात येणार आहेत याबाबतचे आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.याबाबतची माहिती भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांनी दिली त्या ठिकाणी रिफ्लेक्टर नसल्यामुळे घाटात रात्रीच्या वेळी गाड्या चालवणाऱ्या वाहनधारकांना कसरत करावी लागते याबाबत पाठपुरावा करण्यात आला होता त्यानुसार तात्काळ रिफ्लेक्टर लावण्यात यावेत अशा सूचना पालकमंत्री दिल्याचे श्री गावडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page