✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
पणदूर – घोडगे राज्य महामार्गा 24 तास उलटले तरी पाणीखाली आहे. याबाबत ग्रामस्थांनमधुन संताप व्यक्त होत आहे.बुधवारी १९ जुलै ते आज २३ पर्यंत पणदुर घोडगे रस्त्यावर पाणी आलेले आहे.त्यामुळे लोकांची जाण्या येण्याचे समस्या निर्माण झाली आहे.बस सेवा देखील पूर्णपणे बंद झाली असुन प्रवासांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.लघुपाटबंधारे विभाग,कणकवली यांना सुचित करुनही कोणतीही कार्रवाई झाली नाही.पाणी सोडले नसल्याने पाणी रस्त्यावर आले आहे.त्यावर उपाययोजना न केल्यास ग्रामस्थ जलसमाधी घेतील असे संतप्त ग्रामस्थ सांगत आहेत.
