✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 22 जुलैला जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविले जाणार आहेत अशी माहिती युवक जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांनी दिली.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा 22 जुलैला वाढदिवस आहे याबाबत बोलताना श्री सूद्रिक म्हणाले अजितदादा पवार यांचा वाढदिवस आम्ही दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक शैक्षणिक आरोग्य अशा उपक्रमानी सामाजिक बांधिलकी जोपासून साजरा करत असतो आज ते राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत त्यांच्यामुळे राज्यासह आपल्या सिंधुदुर्ग जिल्हाचा सर्वागीण विकास होणार आहे यापूर्वी सुद्धा त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी भरघोस निधी दिला होता अशा या आपल्या नेत्याचा वाढदिवस तेवढ्याच दिमाखात साजरा करण्यासाठी युवा वर्ग सरसावला आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवितानाच वृक्ष संवर्धन काळाची गरज ओळखून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत वृक्ष वाटप वृक्ष लागवड ,शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच आरोग्य शिबिर अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page