ऍड विवेक मांडकुलकर यांचे शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव येथे युवती स्वसंरक्षण कार्यक्रमात प्रतिपादन..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

येथील शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव येथे महिला बालविकास विभाग आयोजित युवती स्वसंरक्षण कार्यक्रमात ऍड विवेक मांडकुलकर बोलत होते यावेळी यावेळी व्यासपीठावर वनस्टॉप सेंटर च्या ऍड. मिनाक्षी नाईक ऍड.रुपाली प्रभू समुपदेशन केंद्र कुडाळचे श्री महेंद्र जाधव श्री यश नाईक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सलीम तकीलदार सौ.अर्चना चव्हाण, सौ सुप्रिया पेडणेकर उपस्थित होत्या.यावेळी ऍड विवेक मांडकुलकर यांनी विद्यार्थीना मोबाईल पासून दूर राहा,आज महिला अनेक समस्यांनच्या बळी ठरत आहेत त्यामध्ये कौटुंबिक छळ, मानसिक छळ ,अत्याचार महिलांची होणारी तस्करी, याच्या घटना वारोवार घडत आहेत या घटना घडू नये म्हणून सावधगिरी व दुर्दैवाने एखादी घटना घडली तर कायद्याची मदत कशी होऊ शकते याविषयी त्यानी सविस्तर माहिती दिली.यावेळी समुपदेशन केंद्र कुडाळचे श्री महेंद्र जाधव यांनी विद्यार्थ्यांनीना मार्गदर्शन केली तसेच श्री यश नाईक यांनी काही स्वसंरक्षणासाठी काही कराटेच्या प्रात्यक्षिकांची माहिती दिली.यावेळी ऍड.मिनाक्षी नाईक यांनी सखी फाऊंडेशन व वन स्टॉप सेंटर मार्फत सामाजिक बंधीलकेच्या भावनेतून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.या विद्यार्थीना मुख्याध्यापक श्री सलीम तकीलदार यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा.शिक्षक श्री विद्यानंद पिळणकर व ऍड.रुपाली प्रभू यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page