✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.

     
ना.दिपक केसरकर मित्रमंडळ,शिवसेना सावंतवाडी मतदारसंघ व लोकमान्य हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार १८ जुलै ते रविवार २३ जुलै या कालावधीत मोफत ऑर्थोपेडिक कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार १८ जुलै रोजी सकाळी १० वा. ग्रामीण रुग्णालय शिरोडा,१९ जुलै रोजी सकाळी १० वा. उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला,२० जुलै रोजी सकाळी १० वा. उपजिल्हा रुग्णालय दोडामार्ग,२१ जुलै रोजी सकाळी १० वा. प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी,२२ जुलै रोजी सकाळी १० वा. प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा व २३ जुलै रोजी सकाळी १० वा. उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी याठिकाणी आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या अस्थिरोग तज्ञामार्फत मोफत तपासणी करण्यात येणार आहे.नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन वेंगुर्ले शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page