▪️प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले नियुक्तीचे पत्र..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली.

राज्यात घडलेल्या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी अजितदादा पवार यांची निवड झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी अबिद नाईक यांची निवड करीत असल्याचे पत्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आहे..

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे. तरी आपण पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यापर्यंत पोहचवण्यासाठी पक्षाला आपले सहकार्य राहील असा मला विश्वास आहे असे अबिद नाईक यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी संघटनेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे अमित नाईक कार्यरत असून राष्ट्रवादी संघटना वाढीसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे राष्ट्रवादीचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यक्षम नेतृत्व आणि सर्वांना सांभाळून घेणारे सर्वसमावेश नेतृत्व म्हणून अबिद नाईक यांची ओळख आहे. राष्ट्रवादी नेते म्हणून सिंधुदुर्गात पक्ष वाढीसाठी योगदान देत असताना कणकवली नगरपंचायतीचे नगरसेवक म्हणूनही अबिद नाईक यांनी यशस्वी जबाबदारी पार पाडली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली होती. पक्ष नेतृत्वाने आता राष्ट्रवादी पक्ष संघटना बळकटीसाठी अबिद नाईक यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे.

यावेळी अबिद नाईक यांच्या समवेत राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य सावळाराम अनावकर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पावस्कर, माजी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, माजी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विलास गावकर, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शेख, शहर उपाध्यक्ष अमित केतकर, शहर सरचिटणीस गणेश चौगुले, राष्ट्रवादी शहर युवक अध्यक्ष निशिकांत कडुलकर, माजी राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण जिल्हा अध्यक्ष दिलीप वर्णे, केदार खोत, प्रवीण मोर्ये आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page