✍🏼लोकसंवाद /- सातारा.
मी कोणालाही छुपा पाठिंबा दिलेला नाही.त्यामुळे छुपा कोणी सुडबूध्दीने चुकीचा अर्थ काढू नये, पक्ष वाढवण्यासाठी आजपासून मोहीम सुरू केली आहे. माझ्या समवेत ७० ते ८० टक्के तरुण आहेत. त्यामुळे तीन महिन्यात महाराष्ट्रातील चित्र बदलेल, असा विश्वास आज सातारा येथे बोलताना राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. दरम्यान अजित पवार म्हणजे पक्ष नव्हे ते अन्य ठिकाणी गेले तरी ते परके नाही. आमच्यात विचारावरून मत भिन्नता असू शकते, असे सांगून काँग्रेसने आता विरोधी पक्षनेते पदावर दावा करावा, असेही सूचक विधान त्यांनी केले.राष्ट्रवादी फुटल्यानंतर शरद पवार यांनी आज आपला दौरा सुरू केला •आहे. या पार्श्वभूमीवर सातारा येथे ते पत्रकारांशी बोलत होते
