✍🏼लोकसंवाद /- मालवण.

शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांना सगळ्याच गोष्टीत राजकारण आणि अर्थकारण दिसत आहे तसे आमचे नाही. तोक्ते वादळात नुकसान भरपाई ही नुकसान झालेल्या जनतेला सरकारने देणे क्रमप्राप्त होते. त्यामध्ये राजकारण करणे हे बरोबर नव्हते. संबंधित नुकसान.

वादळात नुकसान भरपाई ही नुकसान झालेल्या जनतेला सरकारने देणे क्रमप्राप्त होते. त्यामध्ये राजकारण करणे हे बरोबर नव्हते. संबंधित नुकसान भरपाई मिळालेल्यांची यादी पाहता कुणाला किती पैसे मिळाले याची सरकारी यादी आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना झालेल्या नुकसानी पैकी सरकारने किती पैसे दिले याचीही यादी आमच्याकडे आहे. त्यामुळे बाबी जोगी यांनी भाजपच्याच कार्यकर्त्यांनी लाभ घेतला हे म्हणणे चुकीचे असून हा लाभ ज्याचे नुकसान झाले त्याला देणे क्रमप्राप्त होते असे भाजपचे शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी पत्रकात म्हटले आहे.आम्ही कुठलेही आंदोलन करत असताना अर्थकारण बघून राजकारण केले नाही. मी तालुकाध्यक्ष असताना नदी किनारपट्टीतील नागरिकांनी वाळू प्रश्नाबाबत माझ्याकडे तक्रारी घेऊन आल्यानंतरच मी वाळू प्रश्नाला हात घातला होता. त्यावेळी या वाळू व्यावसायिकांकडून किंवा आंदोलनकर्त्यांकडून कधी अर्थकारणाची अपेक्षा ठेवली नाही. असले अर्थकारण कधी आम्ही केले नाही. ज्यावेळी मी वाळू प्रश्न हातात घेतला त्यावेळी आमदारही वाळू प्रश्नाला हात घालण्यास धजावत नव्हते.. त्यावेळी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे प्रामाणिक काम मी करत आहे करत राहीन. आता परिस्थिती वेगळी आहे अनधिकृत वाळू व्यावसायिकांना आमदारांचेच आशिर्वाद आहेत हे सर्व जनता जाणून आहे. या अनधिकृत वाळू संदर्भात का कारवाई होत नाही हे पण आपण जाहीर करावे. सरकार मध्ये असताना एक भूमिका आणि विरोधात असताना एक भूमिका हे आमचे धोरण नाही. त्यामुळे राजकारण हे माझे उपजीविकेचे साधन नाही. ज्यावेळी बाबी जोगी सत्तेमध्ये होते. त्यावेळी पर्ससीनधारक मच्छीमारांच्या विरोधात ठामपणे उभे राहून विरोध का केला नाही? त्यावेळी पर्ससीन मच्छिमारी बंद होती का? ज्यावेळी सत्तेत नसतात त्याचवेळी मच्छीमारांच्या विरोधातले आंदोलन त्यांना आठवते असे आमचे नाही. असा टोला त्यांनी जोगी यांना लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page