✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

शून्य शिक्षक ही शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी स्थानिक डी एड, बी एड धारकांची मेरिटवर तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक करावी किंवा माजी शिक्षकांना नेमणुक द्यावी,यासाठी येणाऱ्या खर्च व निधीतून खर्च करावा अशी सुचना राज्यातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत अशी माहिती स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. तर जिल्ह्यातील विरोधकांनी रिकामे खोक आंदोलने करावी मात्र भरलेले खोके मातोश्रीवर जातात हे सुद्धा त्यांनी लक्षात ठेवावे असा टोला हे त्यांनी आज लगावला.
मंत्री केसरकर यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page