✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
कुडाळ तालुक्यातील आंजीवडे या ठिकाणी गेले आठ दिवस रस्ते वाहतूक पूर्णपणे बंद होती. आंजीवडे ग्रामस्थ यांनी सर्व लोकप्रतिनिधिनकडे पाठपुरावा करून काहीही उपयोग झाला नाही. ग्रामस्थांची गैरसोय पाहता भाजप च्या माध्यमातून माजी खासदार निलेश राणे तसेच विशाल सेवा फाउंडेशन अध्यक्ष विशाल परब यांच्या सहकार्याने आंजीवडे मार्ग पूर्णत्वास करण्यात आला.यावेळी सर्व ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टी सिंधुदूर्ग तसेच विशाल सेवा फाऊंडेशन यांचे आभार मानले,
