✍🏼लोकसंवाद/- अमिता मठकर कुडाळ.

महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळातर्फे 29 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आलेल्या गणित प्रज्ञा परीक्षेत एस.एल.देसाई विद्यालय,पाट ची विद्यार्थिनी कुमारी सोहनी संदीप साळसकर हिने सिल्वर कॅटेगिरी मध्ये विशेष नैपुण्यासह प्रमाणपत्र प्राप्त केले असून जिल्ह्यातील एकूण सात प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये तिचा समावेश आहे.

अवघड असणाऱ्या या स्पर्धेमध्ये अभ्यासातील चिकाटी असेल तरच यश मिळते.पाट हायस्कूलमध्ये गणित मंडळ, विज्ञान मंडळामार्फत विविध उपक्रम वर्षभर घेतले जातात, त्यामुळेच हे यश मिळते. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक सौ.निवतकर मॅडम,श्री. कांबळे सर,श्री. सांगळे सर,श्री.बुरूड मॅडम यांचे अभिनंदन करण्यात आले. गणित अध्यापक मंडळाच्या कुडाळ येथे घेतलेल्या मार्गदर्शन वर्गाचाही फायदा झाला .

सोहनीने मिळवलेल्या यशाचे कौतुक संस्था उपाध्यक्ष दिगंबर सामंत, कार्याध्यक्ष समाधान परब,कार्यवाह सुधीर ठाकूर,संस्था सदस्य गणपत नार्वेकर, श्री.देवदत्त साळगांवकर,श्री.नारायण तळवडेकर,श्री. अवधूत रेगे, श्री. सुभाष चौधरी,श्री. संजय ठाकूर,श्री.राजेश सामंत,श्री.दीपक पाटकर,प्रशालेचे मुख्याध्यापक शामराव कोरे ,पर्यवेक्षक राजन हंजनकर, सर्व शिक्षक वृंद ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page