✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

संत तुकाराम महाराज देहू येथे वारकरी समाजावर लाठीचार्ज झाला याचा निषेधार्थ उद्या मंगळवार दिनांक 13 जून रोजी सकाळी ठीक साडेदहा वाजता कुडाळ तहसीलदार कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीने भजन करून टाळ वाजून आंदोलन करायचे आहे. यावेळी आमदार कुडाळ मालवणचे आमदार श्री वैभवजी नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजयजी पडतेराष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमितजी सामंत ,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख उपस्थित राहणार आहेत. तरी महाविकास आघाडीच्या शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडी कुडाळ तालुक्याच्या वतीने श्री अभय शिरसाठ, राजन नाईक,भास्कर परब यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page