✍🏼लोकसंवाद /- मुंबई.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले होते.ही धमकी ट्विटरवरुन दिली होती. या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना भेटून तक्रार दिली होती, तसेच कारवाईची मागणीही केली होती.या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी कारवाई केली असून एका आयटी इंजिनिअरला अटक केली. आरोपीला १४ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
