✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

कुडाळ नगरपंचायत प्रभाग क्रमांक 9 मधिल वरची गोधडवाडी येथे पाण्याची टंचाई जाणवत होती.याबाबत पाण्यासाठी लक्ष घालावे अशी येथील ग्रामस्थांची मागणी होती. सदर बाब लक्षात घेऊन नाबरवाडी वार्ड क्र. 9 च्या कार्यतत्पर नगरसेविका सौ.श्रेया गवंडे व राजू गवंडे यांनी येथील लोकांच्या गैरसोयीची तत्परतेने दखल घेत गोधडवाडी येथील विहिरीची खोली वाढवून त्यामध्ये स्वखर्चाने रिंग घालुन दिल्या. आणि येथील रहिवाशांची पाण्याची समस्या दूर केली.गोधडवाडी येथील रहिवाश्यांनी नगरसेविका श्रेया गवंडे व राजू गवंडे यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page