✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ दापोली चे १५ वे कुलगुरू पदी डॉ.संजय भावे यांची नियुक्ती झाली आहे. म्हणून उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथे काल (ता.७) भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मुळदे चे सहयोगी अधिष्ठाता डॉ.प्रदीप हळदवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक वर्ग,अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. डॉ.संदीप गुरव यांनी प्रास्ताविकामध्ये कुलगुरु डॉ.संजय भावे यांच्या कार्याचा आढावा विषद केला. डॉ.प्रदीप हळदवणेकर यांनी नवनियुक्त कुलगुरूंना शुभेच्छा दिल्या. डॉ.परेश पोटफोडे यांनी सर्वांचे आभार मानले. प्राध्यापक, अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी नी नवनियुक्त कुलगुरू भावे यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page