✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी.

अंमली पदार्थांची तस्करी, अवैध वाहतूक, अंमली पदार्थांची विक्री यावर निर्बंध आणण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. गांजा, अफु, खसखस यांची जिल्ह्यामध्ये अवैध लागवड होणार नाही, याची संबंधीत यंत्रणांनी दक्षता घ्यावी, अशा प्रकारची अवैध लावगवड झाल्याचे निर्दशानास आल्यास पोलीस विभागाने कठोर कारवाई करावी. अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय नार्को को ऑडीनेशन सेंटर व जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची एकत्रित बैठक आज झाली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, प्रादेशिक बंदर अधिकारी टी. जी. मस्के, अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी एस. आर. पाटील हे प्रत्यक्ष बैठकीला उपस्थितीत होते. तसेच विविध विभागाचे अधिकारी ऑनलाईन बैठकीत सहभागी होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक महेंद्र घाग यांनी सर्वांचे स्वागत करुन विषय वाचन केले. तसेच विभाग निहाय आढावा घेतला. अंमली पदार्थ प्रतिबंधात्मक उपाय योजना अंमलबजावणीबाबत गृह विभाग व सर्व संबंधित विभागाव्दारे सुरु असलेल्या कामाची माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सुकटे म्हणाले, जिल्ह्यातील व्यसन मुक्ती केंद्र योग्य पध्दतीने सुरु असल्याबाबतची तपासणी करावी. जिल्ह्यातील सर्व चेकपोस्टवर तपासणी करण्यात यावी. तसेच अंमली पदार्थाच्या सेवनाच्या दुष्पपरिणामांची माहिती व्हावी यासाठी जनजागृती करण्यात यावी. सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून आरोग्य विभागाने व्यसनामुळे होणाऱ्या आजाराबाबत कार्यक्रम घ्यावेत. व्याख्यान, कार्यशाळा त्याबरोबर प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करावे. सर्व विभागांनी संयुक्तपणे अंमली पदार्थ लागवड, विक्री तसेच वाहतूक याविरोधात मोहीम राबवावी.

गांजा लागवडीची माहिती देणाऱ्यास बक्षीस आपल्या आसपासच्या परिसरात छुप्या पध्दतीने जर कोणी गांजा अथवा अफुची लागवड करत असल्यास किंवा केली असेल तर याबाबतची माहिती तात्काळ ओरोस येथील पोलीस नियंत्रण कक्ष 02362-228200/ 228614 या दूरध्वनीवर संपर्क साधून द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त राखले जाईल शिवाय त्याला बक्षीसही दिले जाईल. असे आवाहन अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीला अशा अवैध लागवडीची माहिती पुरवावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page