▪️अद्वैत फाऊंडेशन आयोजित राष्ट्र सेवा दल व्यक्तीमत्व विकास शिबिराचा

✍🏼लोकसंवाद /- कणकवली.

अद्वैत फाऊंडेशन च्या माध्यमातून राष्ट्र सेवा दलाचे संस्कार युवा पिढीकडे संक्रमित करण्याचे काम कौतुकास्पद आहे.महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंसारखी छोटी छोटी बेटे राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरातून निर्माण होतील असे प्रतिपादन राष्ट्रीय साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त जेष्ठ साहित्यीक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी केले.अद्वैत फाऊंडेशन कणकवलीच्या वतीने गोपुरी आश्रम वागदे येथे 11 मे ते 15 मे दरम्यान राष्ट्र सेवा दल व्यक्तिमत्त्व विकास निवासी शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रा.बांदेकर बोलत होते.यावेळी व्यासपीठावर राष्ट्र सेवा दल चे राष्ट्रीय संघटक बाबासाहेब नदाफ, अद्वैत फाऊंडेशन च्या अध्यक्ष सरिता पवार, सचिव राजन चव्हाण, माणुसकी फाऊंडेशन आजरा चे अध्यक्ष अमित प्रभा वसंत,माजी नगरसेविका सुप्रिया नलावडे, हरिहर वाटवे, विनायक मेस्त्री , विद्या राणे, बाबनी मापारी,चंदन माटुनगे, विजय होगन्नवार , सतीश सौदे, रोहित कुरणे, विश्वास राशिवडे, पालकवर्ग आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना प्रा. बांदेकर म्हणाले की, व्यक्तीमत्व विकास म्हणजे आपल्या आचार आणि विचारांतील झालेले चांगले बदल. स्वतःची कामे स्वतः करत स्वावलंबी बनण्याचा धडा या शिबिरातून मिळतो. अद्वैत फाऊंडेशन स्थापन करून सरिता पवार आणि राजन चव्हाण यांनी सुरू केलेले कार्य देशात वेगवेगळ्या ठिकाणी अन्य संस्थांच्या माध्यमातून उभे राहिले तर भारत देश वैचारिक महासत्ता नक्कीच बनेल. देशात सध्या असलेले अराजकतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सुजाण नागरिक म्हणून पुढे येणे हे आपले कर्तव्य आहे.मुलांवर देशहिताचे चांगले संस्कार करतानाच सुसंस्कृत नागरिक म्हणून पालकांनी जगणे आणि इतरांना तसे जगण्यासाठी प्रवृत्त करणे ही आजच्या काळाची गरज आहे.यावेळी बोलताना राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय संघटक बाबासाहेब नदाफ म्हणाले की अद्वैत फाऊंडेशन मानवतेचा विचार समाजातील सर्व जाती धर्मातील युवा पिढीला शिकवण्यासाठी राष्ट्र सेवा दलाचे शिबीर मागील 6 वर्षे प्रसंगी पदरमोड करून आयोजित करत आहे. जेव्हा राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरात सर्व जाती धर्माची मुले एकत्र येतात तेव्हा मला अखंड भारत देशाचे दर्शन होते असे साने गुरुजी म्हणत असत. अद्वैत फाऊंडेशन आयोजित या शिबिरात त्याची प्रचिती आली. राष्ट्र सेवादलाचे शिबिरार्थी म्हणजे माणूस घडविणाऱ्या सजीव भिंती आहेत. माणुसकी फाउंडेशन चे अध्यक्ष अमित वसंत प्रभा म्हणाले की, माणुसकी हाच खरा धर्म असल्याची शिकवण अद्वैत फाऊंडेशन राष्ट्र सेवा दल शिबिराच्या माध्यमातून बाल आणि युवा पिढीला देत आहे.जात धर्म आणि पंथ विरहित मानवतेचा संदेश देण्याचे अद्वैत फाऊंडेशन चे काम कौतुकास्पद आहे. शिबिर समारोप प्रसंगी शिबिरार्थीना साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर, भालचंद्र मेस्त्री, माजी नगरसेविका सुप्रिया नलावडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. पाच दिवसीय निवासी शिबीर समारोप प्रसंगी शिबिरार्थी नी झांज नृत्य, लेझीम नृत्य, दांडिया, कॅलेस्थिनिक्स, एरोबिक्स नृत्य, देशभक्तिपर गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सूत्रसंचालन सुप्रिया पाटील यांनी केले तर प्रास्ताविक राजन चव्हाण यांनी केले. आभार सरिता पवार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page