✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी गणित विषय खूप महत्त्वाचा असतो. गणित विषयाची आवड निर्माण करण्यासाठी व स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग सिंधुुदुर्ग यांच्या वतीने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी चार दिवसीय ऑनलाईन वेदिक गणित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेचे उदघाटन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे संस्थापक आमदार श्री संजयजी केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याध्यक्ष श्री राजेश सुर्वे, राज्य संपर्क प्रमुख श्री राजेंद्र नांद्रे, जिल्हाध्यक्ष श्री गणेश नाईक, कार्यवाह श्री सुनिल करडे, मार्गदर्शिका सौ विधी वैभव मुद्राळे उपस्थित होते.

सदर कार्यशाळा दिनांक १० ते १३ मे २०२३ या कालावधीत घेण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने गूगल मीट च्या माध्यमातून कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षिका सौ. विधी वैभव मुद्राळे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

सदर कार्यशाळेत ५० विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी सहभाग नोंदवला होता. स्मॉल फ्रेंड, बिग फ्रेंड आणि त्याचा बेरीज वजाबाकी करतानाचा उपयोग, डॉट मेथड वापरून बेरीज व वजाबाकी, पाच, पन्नास, पंचवीस, अकराचा गुणाकार, नऊच्या पटीतला गुणाकार, दोन अंकी गुणाकार, सरासरी काढणे, तसेच वर्ग काढणे, विभाजतेच्या कसोट्या, सोप्या पद्धतीने दोन अंकी व तीन अंकी संख्यांचे पाढे हे वेदिक गणित च्या क्लृप्त्या वापरून शिकवण्यात आल्या. सर्व घटक सरावाने सहजसाध्य तसेच गणित विषयातील उदाहरण कमी वेळात होण्यासाठी नक्कीच मुलांना फायदेशीर आहे. विद्यार्थ्याची पूर्व व उत्तर चाचणी देखील घेण्यात आले. तसेच त्यांना कार्यशाळेचे प्रमाणपत्र देण्यात आले. या पूर्वी ही अशा पद्धतीची कार्यशाळा सौ विधी वैभव मुद्राळे यांच्या सहकार्याने कोरोना काळात घेण्यात आलेल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page