लोकसंवाद/- दोडामार्ग.
दोडामार्ग मधील घोटगेवाडी येथील भटवाडीत कालव्याच्या मोरी शेजारी महिलेचा मृतदेह आढळला असून मृत्त व्यक्तीचा चेहरा ठेचून टाकल्याने चेहऱ्याची ओळख पटत नसून तो खून असल्याचे समजते,महिलेला मारून ओढत आणल्याच्या रस्त्यावर खुणा देखील आढळल्या आहेत संबधित घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत मात्र या निर्घृण हत्येने घोटगेवाडी परिसरसह दोडामार्ग तालुका पुन्हा हादरला आहे हा मृतदेह रात्री साधारण पावणे दहा वाजता पाहिल्याची माहिती घटनास्थळा वरून मिळत आहे.
