✍🏼लोकसंवाद /- मुंबई.

कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून आपण अध्यक्षपदी कायम राहणार असल्याचा भूमिका राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे जाहीर केली. मात्र कोणतीही जबाबदारीचे पद घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आपण अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय घेतल्यानंतर राज्यासह देशातील कार्यकर्त्यांत त्याचे तीव्र पडसाद उमटले, कार्यकर्ते नाराज झाले. त्यामुळे त्यांचा आदर ठेवून संघटना मजबूत राहावी यासाठी आपण निर्णय मागे घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page