✍🏼लोकसंवाद /-कुडाळ अमिता मठकर

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती योजना परीक्षा( NMMS) सन 2022- 23 मध्ये एस. के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संचलित एस्. एल्. देसाई विद्यालय व कै. सौ सीताबाई रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालय तथा कै.डॉक्टर विलासराव देसाई कला, वाणिज्य, विज्ञान उच्च महाविद्यालयाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक ११ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. संस्था कार्याध्यक्ष माननीय श्री. समाधान परब, उपाध्यक्ष माननीय श्री.दिगंबर सामंत, संस्था सचिव माननीय श्री. सुधीर ठाकूर, संस्था खजिनदार माननीय श्री. देवदत्त साळगावकर व सर्व संस्थाचालकांची प्रेरणा व प्रोत्साहन ,तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री. शामराव कोरे, पर्यवेक्षक माननीय श्री. राजन हंजनकर यांचे मार्गदर्शन व प्रशालेतील शिक्षकांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी असे घवघवीत यश संपादन केले आहे.

NMMS शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी १) तन्मय तुकाराम गोसावी 103 गुण २) जयेश उत्तम निर्गुण 101 गुण ३) दिनार शैलेश मयेकर 98 गुण ४)यश वैभव मांजरेकर ९५ गुण ५)मयूर महेश परब 95 गुण ६) जयवंत सुधीर कुडव 95 गुण ७) धनश्री शशिकांत पाटकर 92 गुण ८) रसिका लक्ष्मण झाड ९१ गुण ९) पुष्पराज चंद्रकांत परब ९० गुण १०) संचिता शांताराम राऊत 88 गुण ११)सुश्रुषा गणेश परब 84 गुण या सर्व विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन करून शाळेचे नाव उज्जवल केले आहे. सर्व संस्था पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक ,पर्यवेक्षक या सर्वांनी शिष्यवृत्ती प्राप्त यशस्वी विद्यार्थ्यांचे पालकांचे तसेच मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.प्रशालेतील सौ. नंदिनी बुरुड, सौ. प्रगती निवतकर, सौ. दीपिका सामंत,सौ.सिद्धीचव्हाण,श्री .विनायक कांबळे, श्री.मारुती सांगळे, श्री.सयाजी बोंदर, श्री.आनंदा हाक्के ,श्री.प्रशांत चव्हाण या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. NMMS शिष्यवृत्ती परीक्षा प्रमुख म्हणून प्रशालेच्या शिक्षिका सौ. नंदिनी बुरुड यांनी काम केले. या घवघवीत यशा बद्दल सन्मा प्रदीपकुमार मनोहर कुडाळकर शिक्षणाधिकारी (योजना ) यांनी संस्था,विद्यालय,मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी यांचे विशेष अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page