✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

रस्त्याच्या विरूद्ध दिशेने भरधाव वेगाने गाडी चालवून पादचाऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता: करण्यात आली आहे.कुडाळ एमआयडीसी रेल्वे पुलाजवळ रस्त्याच्या विरुद्ध दिशेने गाडी चालवून पादचाऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपातून आरोपी संदीप आत्माराम राऊळ रा. तेंडोली ता.कुडाळ याची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कुडाळ सौ.ए जे बाचुलकर यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आरोपी तर्फे ॲड विवेक मांडकुलकर, ॲड प्रणाली मोरे यांनी काम पाहिले.तसेच ॲड भुवनेश प्रभुखानोलकर, ॲड प्रज्ञा पाटील यांचे सहकार्य लाभले.

दिनांक ०५/०९/२०१८ रोजी सायंकाळी ०४:४५ च्या सुमारास कुडाळ एमआयडीसी रेल्वे पुलाजवळ रस्त्याच्या विरुद्ध दिशेने गाडी चालवून पादचाऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी फिर्याद कुडाळ पोलीस ठाणे येथे देण्यात आली होती. याकामी भा. द. वि कलम ३०४अ, २७९, मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर केसचे कामी सरकार पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले होते. साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती तसेच आरोपी तर्फे ॲड विवेक मांडकुलकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून मे.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कुडाळ सौ. ए जे बाचुलकर यांनी आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page