✍🏼लोकसंवाद /- कणकवली.
ऑनलाइन रेशन कार्ड प्रणालीमुळे लोकांना होणाऱ्या त्रासाबाबत तहसीलदार कणकवली यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने निवेदन देण्यात आले रेशन कार्ड ऑनलाइन करतेवेळी रेशन कार्ड धारकांच्या नावामध्ये घोळ झालेला दिसत आहे काही रेशन कार्ड वर रेशन कार्ड धारका व्यतिरिक्त दुसऱ्याच व्यक्तींची नावे समाविष्ट करण्यात आली आहे त्यामुळे रेशन कार्ड धारकांना नाहक मनस्ताप होत आहे तसेच काही रेशन कार्ड रद्द झाली आहेत व त्यामुळे त्यांना रेशन मिळत नाही व लोकांचे नुकसान झाल्याची तक्रारी आहेत या संदर्भात कणकवली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले तरी लवकरात लवकर या संदर्भात कारवाई व्हावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले तहसीलदारांनी लवकरात लवकर याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले यावेळी प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, कणकवली शहर युवक अध्यक्ष संदेश मयेकर, सिंधुदुर्ग जिल्हा युवक चिटणीस सागर वारंग, विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, कृषी सेल कणकवली तालुकाध्यक्ष चंद्रकांत नाईक, प्रकाश सावंत उपस्थित होते.
