✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

दरवर्षीप्रमाणे या वर्षाची जागतिक होमिओपॅथी दिनाची संकल्पना “सर्वजण स्वास्थ” हि असुन जनसेवा प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन आणि आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त सोमवार, दिनांक १० एप्रिल रोजी कुडाळ तालुक्यातील पणदुर हायस्कूल, पणदुर सभागृहात जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यक्रमात “कर्करोग आणि होमिओपॅथिक उपचार ” या विषयावर होमिओपॅथिक तज्ञ डॉ.सुखदेव कुंभार तर ” होमिओपॅथिक उपचार आणि सर्वसाधारण व्याधी ” या विषयावर होमिओपॅथिक तज्ञ डॉ.जगदिश तेंडुलकर हे मार्गदर्शन करणार आहेत.

जागतिक होमिओपॅथी दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमात डॉ.सुखदेव कुंभार यांना जनसेवा प्रतिष्ठान तर्फे होमिओपॅथिक जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असुन यावेळी यंदा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांच्या आधुनिक औषध प्रणाली म्हणजेच ऍलोपॅथी पदवी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात येणार आहे.

तसेच डॉ.प्रविण सानेकर व
डॉ.बाळकृष्ण ठाकुर यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.तरी सायंकाळी ३ ते ६ या वेळेत आयोजित केलेल्या या कार्यशाळेत जास्तीत जास्त डॉक्टर यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजीव लिंगवत व सिंधुदुर्ग होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ.अरूण गोडकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page