✍🏼लोकसंवाद /- कणकवली.

शिवसेना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख रविंद्र फाटक हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्त कणकवली मातोश्री हॉल कणकवली येथे शनिवार 11 मार्च 2023 दुपारी 3 वाजता आम. रविंद्र फाटक यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे.यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांची मुख्य उपस्थिती असणार आहे.शनिवार 11 मार्च 2023 दुपारी 3 वाजता मातोश्री मंगल कार्यालय कार्यकर्ता व शिवसैनिकांचा मेळावा, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा सत्कार, पक्षप्रवेश मेळाव्यात होणार आहे. तरी शिवसैनिकांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page