✍🏼लोकसंवाद /- मालवण.

रामेश्वर मांड मित्रमंडळ सोमवार पेठ मालवण यांच्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने बुधवार दि. २२ मार्च रोजी श्री सत्यनारायणाची महापूजेसह चार दिवस विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, नाटक यांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंगळवार दि. २१ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत खुली जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी किमान एक पूर्ण मनुष्याकृती अपेक्षित आहे तसेच इतर नियम व अटी आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक – रु. ५ हजार, द्वितीय क्रमांक – रु. ३ हजार पाचशे, तृतीय क्रमांक रु. २ हजार पाचशे, उत्तेजनार्थ – रु.१ हजार अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. बुधवार दि. २२ मार्च रोजी सकाळी ७ वाजता लघुरुद्र, सायंकाळी ४ वाजता श्री सत्यनारायण पूजेचा महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता सुश्राव्य भजने आयोजित करण्यात आली आहेत. गुरुवार दि. २३ मार्च रोजी रात्री ९ वाजता मामा वरेरकर नाट्यगृह येथे ओंकार दशावतारी नाट्यमंडळ म्हापण यांचे राखचांडाळ हे नाटक, शुक्रवार दि. २४ मार्च रोजी रात्री ९:३० वाजता भंडारी हायस्कुल पटांगण येथे भव्य पडद्यावर चित्रपट दाखविण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रामेश्वर मांड मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page