महिलांसाठी होम मिनिस्टर,पाककला स्पर्धा,संगीत खुर्ची स्पर्धा तर मुलींसाठी रस्सी खेच स्पर्धा,शालेय निबंध स्पर्धा..

१ लाख १० हजार कन्यारत्न पुरस्कार (३४ लाभार्थी ) वितरण तर बक्षिसे व विविध क्षेत्रातीत महिलांचा सन्मान,

देवगड./-


पडेल ग्रामपंचायत सरपंच भूषण रामदास पोकळे यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनानिमित्त बुधवार ८ मार्च रोजी सायंकाळी ४ वा.ते ९ वा या वेळेत पडेल येथील श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर पटांगण येथे महिलांसाठी विविध स्पर्धा व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, .
पडेल ग्रामपंचायत सरपंच भूषण पोकळे यांच्या संकल्पनेतून १५ वा वित्त आयोगातून महिला व बालकल्याण योजने अंतर्गत बालस्नेही गाव संकल्पनेतून कन्यारत्नांच्या भविष्य निर्माण निधी योजनेतून १ लाख १० हजार कन्यारत्न पुरस्कार (३४ कन्यारत्न ना) वितरण करण्यात येणार आहे, .
प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हा अधिकारी स्वाती देसाई, .
पडेल मंडळ अधिकारी रेश्मा कडुलकर,डॉ. अर्चना किरण मराठे (देवगड ) ल.डॉ. पूजा मालपेकर,(पडेल ).आदी उपस्थित राहणार आहेत,पडेल गावातील विविध क्षेत्रातील महिला उद्योजक डॉक्टर, वकील,अंगणवाडी सेविका,आशा सेविका,नर्स,पडेल महिला माजी सरपंच /उपसरपंच आदींचा सन्मान करण्यात येणार आहे,३ ते ९ शालेय विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धा,बक्षिसे व प्रशस्ती पत्र,महिलांसाठी होम मिनिस्टर-पैठणी व इतर बक्षिसे व प्रशस्ती पत्र,पाककला स्पर्धा-बक्षिसे व प्रशस्ती पत्र,मुलींसाठी रस्सी खेच स्पर्धा-बक्षिसे व प्रशस्ती पत्र,सर्व महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा-बक्षिसे व प्रशस्ती पत्र,आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे,पडेल गावातील सर्व महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन पडेल ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page