लोकसंवाद /- कुडाळ.

संत राऊळ महाराज महाविद्यालय,कुडाळ येथील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संपाला आजपासून बेमुदत सुरुवात केलेली आहे.हा संप शासकीय महाविद्यालयीन कर्मचारी संघ यांच्यावतीने करण्यात येत आहे. त्यांच्या संपातील प्रमुख मागण्या – १. सेवा अंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेला शासनाने रद्द केलेला आहे तर या प्रगती योजनेला शासनाने पुनर्जीवित करावे, २. तसेच सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार 10, 20, 30 वर्षानंतरच्या लाभाची योजना लागू करावी. ३. तसेच सातवा वेतन आयोग आदेशानुसार वंचित असलेल्या १४१० विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थकबाकी सातव्या वेतनानुसार द्यावी. ४. विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त असली पदे तात्काळ भरण्यासाठी मान्यता द्यावी.५. तसेच 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. ६. तसेच विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी गृहीत धरून त्या आधारे सातवा वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करावी.
अशा प्रकारच्या महत्त्वाच्या मागण्यांसाठी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभागी झालेले आहेत .
सर्व अकृषी विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झालेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page