लोकसंवाद /- कुडाळ.

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दि. 26 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10 ते सांय. 5 या वेळेत कॅालेजमधील (15 वर्षावरील) मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतुने भव्य युवा महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवातील स्पर्धेत या सहभागी होऊन युवकांच्या कलागुणांना मनोरंजनाबरोबरच एक व्यासपीठ मिळावा हा मंडळाचा हेतु असुन . सदर महोत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॅालेज विदयार्थ्यांनी सहभाग दर्शवावा तसेच उपस्थित राहुन कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे. यापुर्वी धीरज परब मित्रमंडळाच्या माध्यमातुन सामाजीक, सांस्कृतीक, शैक्षणिक तसेच आरोग्यविषयक शिबीरे आयोजीत करण्यात आली होती. यामध्ये पिंगुळी व साळगाव येथे भव्य आरोग्य शिबीर आयोजीत करुन यामध्ये खासगी सेवा देणारे तज्ञ डॅाक्टर यांना एकाच छताखाली आणुन ग्रामीण भागात रुग्ण सेवा देण्याचा उपक्रम मंडळाच्या वतीने घेतले गेले. रक्ततपासणी, डोळेतपासणी, मोफत औषधे असे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रत्येकी 400 हुन अधिक रुग्णांनी याचा लाभ घेतला होता. लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतुने 1ली ते 5वी पर्यतच्या मुंलासाठी बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 10 ते सांय. 5 या वेळेत वत्कृत्वस्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पाढे पाढांतर स्पर्धा अशा विवीध स्पर्धा घेऊन विजेत्यांना बक्षिसे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये 350 विदयार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्याचप्रमाणे मुलांचा स्पर्धा परिक्षेत सहभाग वाढावा म्हणुन स्पर्धा परिक्षेसाठी लागणारी पंचवीस हजार कीमतीची पुस्तक मंडळाच्या माध्यमातुन टोपीवाला वाचनालय, कुडाळ यांना देण्यात आली मुले आज त्यांचा विनामुल्य वापर करत आहेत.

या वर्षीच्या महोत्सवातील स्पर्धेचे स्वरुप पुढील प्रमाणे –
 समुह नृत्य स्पर्धा – 1) प्रथम पारीतोषीक – 5 हजार रुपये
2) व्दितीय पारीतोषीक – 4 हजार रुपये
3) तृतीय पारीतोषीक – 3 हजार रुपये

 स्कीट स्पर्धा – 1) प्रथम पारीतोषीक – 4 हजार रुपये
2) व्दितीय पारीतोषीक – 3 हजार रुपये
3) तृतीय पारीतोषीक – 2 हजार रुपये

 एकेरी नृत्यस्पर्धा – 1) प्रथम पारीतोषीक – 3 हजार रुपये
2) व्दितीय पारीतोषीक – 2 हजार रुपये
3) तृतीय पारीतोषीक – 1 हजार रुपये

 एकेरी गायन स्पर्धा – 1) प्रथम पारीतोषीक – 3 हजार रुपये
2) व्दितीय पारीतोषीक – 2 हजार रुपये
3) तृतीय पारीतोषीक – 1 हजार रुपये
 तसेच ‘विनर ऑफ दि कॅालेजीस’ अर्थात मानाचा करंडक देऊन विजेत्या कॅालेजला सन्मानीत करण्यात येणार आहे.

तसेच प्रेक्षक व सहभागी विदयार्थ्यांसाठी दुपारी अल्पोपहार ची व्यवस्था करण्यात आली आहे.
वेळेअभावी प्रवेश मर्यादीत असुन
नाव नोंदणी दि. 23/02/2023 सांय 5 पर्यत करावयाची आहे. महोत्सवा दरम्यान
कुठलेही/कसलेही प्रवेश शुल्क आकारण्यात आले नाही आहे.
सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाला प्रशस्तिपत्र देण्यात येणार असुन
सहभागी विदयार्थ्यांना आधारकार्ड व कॅालेजच ओळखपत्र दाखवणे बंधनकारक राहणार आहे.
तसेच उपस्थित प्रेक्षकांमधुन लकी ड्रॅा आकर्षक बक्षिसे असणार आहेत… दिनांक 26/02/2023 रविवार
वेळ – सकाळी 9.30 ते सायंकाळी 5 पर्यत या महोत्सवाचे आयोजन असुन स्थळ – वासुदेवानंद ट्रेड सेंटर उदयमनगर हॅाटेल RSN च्या मागे ता. कुडाळ या ठिकाणी राहणार आहे.
अधिक माहिती – सचिन गुंड मो. – 9637833638
वेदांग कुडतरकर – 8329951261/9823393977

तरी जास्तीत जास्त युवकांनी यात सहभाग घ्यावा असे मंडळाकडून आवाहन करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page