✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

कुडाळचे नायब तहसीलदारासह तलाठ्याला मारहाण करणाऱ्या ७ ही आरोपींना आज कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी सुनावली २१ फेब्रुवारी पर्यत १४ दिवसाची न्यायालय कोठडी देण्यात आली आहे.तर या संदर्भात कुडाळ पोलिसांनी केली होती २ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी.तर आता पर्यत या प्रकरणातील ४ डंपर व इनोव्हा कार,मोबाईल,मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

कुडाळचे नायब तहसीलदारासह तलाठ्याला मारहाण करणाऱ्या पैकी साई अणावकरसह त्याच्या सोबत आलेले अनोळखी ४ ते ५ जण अजुनही फरारीचं तर कुडाळ पोलीस घेतायत शोध जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री चिंदरकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील हे तपास करीत आहेत.

कुडाळ पोलीसांनी शनिवारी आंब्रड तलाठी नवीन राठोड यांच्या तक्रारीवरून आरोपी अक्षय वालावलकर, गौरव ठाकूर,अमोल ठाकूर, अंकीत नाईक, स्नेहांकित बांदेकर,वैभव देसाई व जागृत परब या ७ जणांना अटक केली आहे.तर हे सातही जण पोलीस कोठडीत होते.आज पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने या सर्वाना आज बुधवारी कुडाळ न्यायालयात हजर करण्यात आले.यावेळी या ७ ही जणांना १४ दिवसाची म्हणजेच २१ फेब्रुवारी पर्यत न्यायालय कोठडी न्यायाधीश यांनी सुनावली आहे.दरम्यान शुक्रवारी रात्री ११ च्या दरम्यान कुडाळ नाबरवाडी स्मशानभूमी जवळील रस्त्यावर कुडाळचे नायब तहसीलदारासह आंब्रड तलाठयाला अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर व्यावसायिकांकडून मारहाण करण्यात आली होती.आंब्रड तलाठी नवीन राठोड यांच्या तक्रारीनुसार मारहाण करणारे एकूण १३ जण असल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.यामध्ये वरील ७ जणांना अटक करण्यात आली आहे.तर ५ ते ६ जण अजूनही फरारी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page