💫Loksancad ADVT न्यूज💫
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
सिंधुदुर्ग सध्या गोव्याच्या पर्यटनक्षेत्राबरोबर स्पर्धा करू लागलाय. जिल्ह्यातील नयनरम्य नैसर्गिक रचना असलेले समुद्रकिनारे, मनमोहक पर्यटन क्षेत्र पर्यटकांच्या मनाला भुरळ घालत आहेत. याच पर्यटन क्षेत्रांचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून कुडाळ शहराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच्या मध्यवर्ती ठिकाणी सूरू झालेले माने जी क्रिएशन नबिझनेस संकुलातील लाईम लाईट (मून लाईट) हे अत्याधुनिक सुखसोयींनी युक्त असे फॅमिली रेस्टॉरंट कुडाळची शान बनले आहे.
शहरातून जाणारा मुंबई-गोवा महामार्ग तसेच अनेक महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांचा थांबा असलेले रेल्वे स्टेशन, मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी, निवती, भोगवे यांसारख्या पर्यटन क्षेत्राकडे जाणारे मार्ग, गोव्यातील मोपा येथील विमानतळ, चिपी विमानतळकडे जाणरे मार्ग कुडाळमधूनच जातात. त्यामुळे कुडाळ विविध दृष्टींनी विकसित होत आहे. त्यामुळे साहजिकच शहरात पर्यटकांची राहण्याची उत्तम सोय, उत्तम मालवणी पदार्थांबरोबरच विविध प्रकारच्या खाण्यापिण्याची शाही व्यवस्था, सर्व सुखसोयींनी युक्त अशी निवास व्यवस्था व्हावी, या दृष्टीने प्रदीप माने दाम्पत्याने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ‘माने जी क्रिएशन’ नावाचे बिझनेस संकुल उभारून त्यामध्ये लाईम लाईट (मून लाईट) नावाचे अत्याधुनिक सुखसोयींनी युक्त असे फॅमिली रेस्टॉरंट सुरू केले. पार्किंगची प्रशस्त व्यवस्था असलेल्या, मनोवेधक, मनमोहक आंतर रचना असलेल्या लाईम लाईट फॅमिली रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केल्यावर अंतर्गत सजावटीने मन तृप्त होते.
कुडाळ शहरात प्रथमच सर्व प्रकारच्या शाही मंगल सोहळ्यांसाठी ‘सिटी हार्ट’ नावाचा बॅक्वेट हॉलही मुंबईच्या धर्तीवर आपले आगळे वेगळेपण सांभाळून आहे. लॉजिंग-एसी, नॉन एसी अशा उत्तम रूम, सूट असलेले त्याचबरोबर १६ सुपर डिलक्स दर्जाच्या सोयींनी युक्त असणाऱ्या रुम्स, सूट अशा विविध प्रकारच्या सुखसोयींनी युक्त असलेल्या या हॉटेलमधले लॉजिंग पर्यटकांना नक्कीच सुखावणारे ठरणार आहे.