✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.
तालुक्यातील वजराट येथील नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव रविवार २५ डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.यावेळी सकाळपासून पूजन, केळी ठेवणे, ओटी भरणे, रात्री पालखी प्रदक्षिणा व त्यानंतर नाईक मोचेमाडकर दशावतार कंपनीचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.भाविकांनी धार्मिक कार्यक्रम व दर्शनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन गावकर व ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
