मालवण /-

कर्नाटकातील वनविभागाच्या वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या कमलाकर नाईक रा. शिराली ता. भटकळ जि. उत्तर कर्नाटक हा फरार सराईत संशयित आरोपी अखेर वन विभागाच्या ताब्यात आला आहे.कुडाळ वनपरिक्षेत्र व कर्नाटक येथील वनपरिक्षेत्र मानकीच्या पथकाने संयुक्त कारवाई करत तालुक्यातील कातवड येथून त्याला ताब्यात घेतले.शासकीय जंगलातील मौल्यवान साग वृक्षांची अवैधरित्या तोड केल्याने कमलाकर नाईक याच्या विरोधात भारतीय वन अधिनियम १९२७ च्या विविध कलमान्वये तसेच अनुसूची ३ मधील वन्यप्राणी सांबराच्या शिकारीसाठी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. मागील दोन दिवसापासून संशयित आरोपी नाईक हा आपले लोकेशन बदलून हुलकावणी देत होता. अखेर त्याला आज ताब्यात घेण्यात वनविभागाला यश आले आहे.

सावंतवाडी उपवनसंरक्षक एस एन रेड्डी व उपवनसंरक्षक रवीशंकर सी, होनावर कर्नाटक राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे, मानकीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सविता देवाडिगा, येथील वनपाल श्रीकृष्ण परीट, मठचे वनपाल सावळा कांबळे, महेश पाटील, दत्तगुरु पिळणकर, मानकीचे उप वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप आरकसाली, योगेश मोगेर व ईश्वर नाईक, वनरक्षक पूजा चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page