सिंधुदुर्ग /-

मानव अधिकार जनजागृती प्रत्यार्थ अप्पर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्याचे आदेशाने,ठाणे पोलीस आयुक्तालय यांनी आयोजित केलेल्या वादविवाद स्पर्धेत सिंधुदुर्गचे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल,प्रमोद बाळकृष्ण काळसेकर यांनी द्वितीय क्रमांक पटकविला आहे.यासाठी सिंधुदूर्ग चे अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाडे यांनी यांनी आज त्यांचे विशेष कौतुक केले आहे.
स्पर्धेत कोकणपरिक्षेत्रातील ठाणे ग्रामीण, पालघर ,रायगड, रत्नागिरी ,सिंधुदुर्ग, व ठाणे नवी मुंबई, मीरा-भाईंदर विरार पोलीस ठाणे, पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची” मानवी हक्क व पोलीस यांची जबाबदारी” हा स्पर्धे चा विषय होता. हया स्पर्धेत विविध ठिकाणा वरुन एकूण २६स्पर्धक सहभागी झाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या स्पर्धेसाठी प्रमोद काळसेकर यांची निवड झाली होती ,प्रमोद काळसेकर यांचा द्वितीय क्रमांकपटकविल्याने सिंधुदूर्ग चे अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाडे यांनी यांनी आज विशेष कौतुक केले आहे. यावेळी पोलीस उपाधीक्षक कविता गायकवाड , पोलीस निरीक्षक संदीप भोसले ,स्थान गुन्हा अन्वेषण चे मनीष कोलटकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक व अधीक्षक कार्यालयातील अंमलदार यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page