कणकवली /-

कणकवली सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उप अभियंता गणेश ज्ञानेश्वर कर्वे (45) यांचे काल सोमवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. गेली काही वर्ष श्री कर्वे हे पोटाच्या आजाराने त्रस्त होते. वर्षभरापूर्वी गणेश कर्वे हे कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता पदी रुजू झाले होते. मनमिळाऊ स्वभाव व काम करण्याकरिता पूर्णपणे सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्यांचे सर्वांशीच स्नेहाचे संबंध बनले होते.

कणकवली तालुक्यात काम करत असताना अशा प्रकारे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उपअभियंता म्हणून काम करणारे बहुदा गेल्या अनेक वर्षांमधील कणकवलीतले ते पहिले अधिकारी होते. काल दुपारी त्यांना अस्वस्थ वाटू लागले व यादरम्यान त्यांना कणकवलीहुन कोल्हापूर मध्ये अधिक उपचार करता हलवण्यात आले. कोल्हापूर येथे पोहचताच त्यांचे निधन झाले. मूळ पाटण येथील असलेले श्री कर्वे हे आपल्या कुटुंबीयांसोबत सातारा येथे स्थायिक झाले होते. त्यांच्या निधनानंतर कोल्हापूरहून त्यांचा मृतदेह सातारा जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला होता. कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी कर्वे यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. गणेश कर्वे यांच्या निधनाने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page