कुडाळ /-
कुडाळ नगरपंचायतीने शहरातील विद्यमान जमीन वापर नकाशा म्हणजे इएलयू प्रसिद्ध केला होता या नकाशावर शहरातून ५३७ हरकती आल्या आहेत आता याबाबत नगर रचनाकार व हा नकाशा तयार करणाऱ्या कंपनीकडे या हरकती देऊन नकाशात बदल केले जाणार आहे.
कुडाळ नगरपंचायतीने भविष्यातील शहराच्या विकासासाठी विद्यमान जमीन वापर नकाशा तयार करण्यासाठी नगररचना व ठेकेदारामार्फत काम केले होते या शहराचा विद्यमान जमीन वापर नकाशा म्हणजे इएलयु तयार करून तो नकाशा प्रसिद्ध करण्यात आला होता आणि यावर हरकती नोंदविण्यासाठी नागरिकांना संधी देण्यात आली होती त्यानुसार कुडाळ शहरातील नागरिकांनी या इएलयुवर हरकती नोंदवले आहे सुमारे ५३७ हरकती कुडाळ नगरपंचायतीत देण्यात आले आहे अनेक हरकती या खाजगी जमिनीत दाखवलेले रस्ते तसेच हिरवा पट्टा याबाबत आहेत या हरकतींबाबत नगर रचनाकार व नकाशा बनवणाऱ्या कंपनीकडे देऊन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे ज्या तक्रारदारांनी तक्रारी बरोबर पुरावे जोडले असतील तर त्यांच्या तक्रारीवर विचार होणार आहे लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
