कणकवली /-
खासदार विनायक राऊत यांचा कट्टर कार्यकर्ता असलेल्या प्रदीप भालेकर ने आमदार वैभव नाईक यांच्या विरुद्ध एसीबी कार्यालयात तक्रार केलेली आहे. प्रदीप भालेकर ही व्यक्ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा कार्यकर्ता आहे. गोरेगाव येथे या भालेकरला खास. विनायक राऊत यांनी घर घेऊन दिलेले आहे.असा कार्यकर्ता जेव्हा स्वतःच्याच पक्षाच्या आमदाराची तक्रार करतो तेव्हा याचा जाब विनायक राऊत यांनाच विचारावा लागेल. शिवसैनिकांनी एसीबी कार्यालयावर आंदोलन करण्यापेक्षा ते विनायक राऊत यांच्या घरावर आंदोलन करावे. कारण खासदार विनायक राऊत यांना वैभव नाईक नकोसे का झाले आहेत हे आज विचारण्याची वेळ आलेली आहे.अशा शब्दात भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सुनावले.
आमदार नितेश राणे म्हणाले त्यांच्याच पक्षाचा व्यक्ती त्यांच्याच आमदारावर आर्थिक व्यवहाराची तक्रार करतो याच व्यक्तीला पुढे करून आमच्या मुंबई येथील अदिश बंगल्यावर तक्रार केली असे असताना आता शिवसेनेची मंडळीं राणे आणि भाजपचे नाव कोणत्या तोंडाने घेत आहेत. जेव्हा एखाद्या संस्थेकडे तक्रार जाते त्यावेळी त्या तक्रारीचा पाठपुरावा करावा लागतो.एसीबी कडे प्रदीप भालेकर यांनी तक्रार केली तक्रारीवरून चौकशी सुरू झाली त्यावेळी सुद्धा भालेकर यांनी आपल्या ट्विटरवर आमदार वैभव नाईक यांची आपल्या तक्रारीवरून चौकशी सुरू झाल्याचे स्पष्ट केले आहे. असे सांगताना आमदार नितेश राणे यांनी तक्रारदार भालेकर याचे ट्विटर हँडल पत्रकार परिषदेत दाखवले ज्यावर मशाल चे चिन्ह आहे शिवसेनेच्या नाव आहे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो डिलीट केलेले माहिती आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा तो कार्यकर्ता असल्याचे पुरावेच यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिले.
तेरा आमदार उद्धव ठाकरे यांच्या समवेत शिल्लक राहिले त्यातल्या वैभव नाईकांना भाजपमध्ये कशाला कोण बोलवेल आणि कधी भाजपमध्ये बोलवले एक तरी पुरावा द्या कोणताही संदर्भ कुठेही लावून भाजपला बदनाम करू नका पक्ष संपवण्याचा प्रकार खासदार विनायक राऊत करत आहेत आमदार शहाजी बापू पाटील यांनी हेच सांगितले आता वैभव नाहीकांना अडचणीत आणून कुडा मालवण ची जागा विनायक राऊत यांच्या मुलीसाठी घ्यायचे आहे का ? असा सवालही यावेळी आमदार नितेश राणे यांनी विचारला.
