सिंधुुदुर्ग /-

सिंधुुदुर्गातील शिवसेनेच्या तिन उपजिल्हाप्रमुखांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे.हे तिन्ही शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ठाकरे गटातील होते.आणि दीपक केसरकर यांचे समर्थक मानले जात होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखांनी शिंदे गटाची वाट धरल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेना सिंधुदुर्गात मोठं खिंडार पडलं आहे.हा प्रवेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गटात या तिन्हीही उपजिल्हाप्रमुखांनी प्रवेश केला.तर ठाकरे यांना नवं निवडणूक चिन्ह दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना हा धक्का बसल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.तर शिंदे गटाला “ढाल-तलवार” पक्षचिन्ह मिळालेले आहे.

यामध्ये उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई तर उपजिल्हाप्रमुख सुनील दुबळे यासह होडावडा शाखा प्रमुख कल्पेश मुळीक या सर्वानी शिंदे गटात प्रवेश केला आहे.यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नितीन शिरोडकर, शिंदे गट वेंगुर्ला तालुका प्रमुख नितीन मांजरेकर आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page