वैभववाडी /-
रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व एमकेसीएल यांच्यामार्फत वैभववाडी तालुक्यात आयकॉन पर्सनॅलिटी स्पर्धेचा शुभारंभ कै. हेमंत केशव रावराणे ज्युनिअर कॉलेज वैभववाडी येथे करण्यात आला. वैभववाडी तालुक्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एमकेसीएल व रोटरी क्लब सिंधुदुर्ग यांच्यावतीने ही स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा चार टप्प्यात घेण्यात येणार असून स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात प्राथमिक फेरीमध्ये आज कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडीतील विद्यार्थ्यांसाठी आयकॉन पर्सनॅलिटी या स्पर्धेची पहिली लेखी परीक्षा घेण्यात येऊन शुभारंभ करण्यात आला. या परीक्षेमध्ये 210 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांना या परीक्षेविषयी रोटरी क्लब ऑफ वैभववाडीचे प्रेसिडेंट संतोष टक्के व एमकेसीएल चे वैभववाडीतील केंद्र संचालक सचिन रावराणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयाचे अधीक्षक जयेंद्र रावराणे, प्राचार्य नादकर सर, रोटरियन प्रशांत गुळेकर, सुनील कुंभार रोहन रावराणे, सुरेंद्र नारकर, पूजा भोवड आदी रोटरीन व प्राध्यापक उपस्थित होते.
अशा प्रकारची परीक्षा आपण पहिल्यांदा देत असून पेपर सोडवताना जीवनातील दिशा नक्की करण्यासाठी विचार करायला भाग पाडणारी ही परीक्षा असल्याचे जाणवले व जीवनात सकारात्मक विचार करायलाच हवेत हे या परीक्षेतून शिकता आल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. लेखी परीक्षा झाल्यानंतर परीक्षेविषयी विद्यार्थ्यांनी व विद्यालयाच्या प्राध्यापकांनी रोटरी क्लब आणि एमकेसीएलचे आभार मानले.
